Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अभिनेत्री रविना टंडन, फराह खानवर नगरमध्ये गुन्हा

Share
अभिनेत्री रविना टंडन, फराह खानवर नगरमध्ये गुन्हा, Actress Tandan Khan Nagar Complient Ahmednagar

ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- चित्रपट अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंह या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली आहे. तोफखाना पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेऊन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तो गुन्हा मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याची ही तक्रार आहे. नगर शहरातील ख्रिश्चन समाजाचे सिसील इश्काक भक्त (रा. सावेडी) यांनी ही तक्रार तोफखाना पोलीस ठाण्याकडे शनिवारी (दि. 28) रात्री केली.

दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी समाजाच्या ग्रंथातील एका शब्दाचा चुकीचा वापर केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर प्रसारित केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान तक्रारीनुसार तोफखाना पोलिसांनी कलम लावली नसल्याचे ख्रिश्चन समाजाचे कार्यकर्ते संजीव पाटोळे यांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी समाजातर्फे आज (सोमवारी) मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!