#OMG : सईचा दीड वर्षापूर्वीच घटस्फोट झालाय!

0

अभिनेत्री सई ताम्हणकरचा दीड वर्षापूर्वीच घटस्फोट झाला असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.

सध्या सई तेजस नेरुरकरच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे.

सईने एका इंग्रजी वर्त्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने खूप साऱ्या गोष्टींवर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.

या मुलाखतीत तिने ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचे देखील सांगितले आहे. या तिच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा होत आहे. या तिच्या मुलाखतीमुळेच तिचा घटस्फोट झाला असल्याचे तिच्या फॅन्सना कळले आहे.

सईने अमेय गोसावी या तरुणासोबत 2013 साली लग्न केले होते.

सईने लग्नादरम्यान तिचा पती आणि त्याच्या कुटुंबातील सर्वजण तिच्या प्रोफेशनसाठी खूप सपोर्टीव असल्याचे सांगितले होते. यानंतर हा घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे हा प्रश्न आहे.

 

 

LEAVE A REPLY

*