Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसोनू सूदला उच्च न्यायालयाचा दिलासा; दिले 'हे' आदेश

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा दिलासा; दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

उपनगरी जुहू येथील निवासी इमारतीत परवानगी न घेता बेकायदा स्ट्रक्चरल बदल केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. महापालिकेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर सोनू सूदनं तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

महापालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंती त्याने केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं सोनू सूदला तात्पुरता दिलासा दिला. मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सोनू सूदची BMC विरोधात उच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी?

अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार केली होती. सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता. महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले होते. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली होती. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या