ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

0
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून ‘आग’ सिनेमातून सिनेमात पदार्पण केले होते.

६० आणि ७० च्या दशकांत शशी कपूर यांचे अनेक चित्रपट खूप गाजले. यात ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार कभी-कभी और फकीरा’सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

त्यांच्या पत्नी जेनिफर यांचा १९८४ सालात कर्करोगाने मृत्यू झाला होता. तेव्हापासून शशी कपूर खचले होते. त्यांची प्रकृतीदेखील ढासळत चालली होती त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीतून सन्यास घेतला होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस व्हीलचेयरवरून काढले होते.

शशी कपूर हे बॉलीवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र होते. शशी कपूर यांचे मूळ नाव बलबीर राज कपूर  होते.  शशी कपूर यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हे चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून झाले होते. राज कपूर यांच्या आवारा आणि आग चित्रपटांमध्ये त्यांनी चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून काम केले होते.

भारत सरकारच्या  पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना २०११ साली गौरवण्यात आले होते. तसेच २०१४ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले होते.

LEAVE A REPLY

*