माऊली परतणार… रितेश देशमुखची पुन्हा एकदा मराठी सिनेमात एन्ट्री

0
मुंबई : आपला हाथ भारी लाथ भारी…. आपल सगळंच लय भारी…..या मराठा मोळ्या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा ‘लय भारी’ सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर तसेच प्रेक्षकांच्या आणि तरुणाईवर जादू केली होती. लय भारी सिनेमातील रितेशने साकारलेला ‘माऊली’ रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता.लय भारी या सिनेमाच्या यशामुळे रितेशच्या दुस-या मराठी सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली होती. हिंदीत विविध सिनेमात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा कधी दिसणार असा प्रश्न रसिकांना पडला होता.आता रसिकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.कारण रितेशचा दुसरा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.’

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट लय भारी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते. रितेश पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. माऊली सिनेमातून लवकरच रसिकांच्या भेटीला येत असल्याचे रितेशने स्पष्ट केले आहे.

माऊली’ असं या सिनेमाचं नाव असेल. 2014 साली लय भारी या सिनेमाच्या यशानंतरच या सिनेमाची घोषणा झाली होती.काही कारणामुळे सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होऊ शकली नाही.त्यामुळे आता रितेशच्या नव्या सिनेमाला मुहुर्त मिळाला आहे.लवकरच ‘माऊली’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.खुद्द रितेशने याबाबतची माहिती दिली आहे.

माऊली’ या सिनेमात रितेश भूमिका साकारत असून या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे.या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून रितेशची निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे.त्यामुळे लय भारी रितेशच्या माऊली सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.

LEAVE A REPLY

*