Type to search

मुख्य बातम्या हिट-चाट

अभिनेते मनोज जोशी साकारणार अमित शाहंची भूमिका

Share
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत.

बहुआयामी कलाकार म्हणून मनोज जोशी यांनी आपली वेगळी ओळख मनोरंजन विश्वात निर्माण केली आहे. विनोदी, खलनायक किंवा गंभीर असा विविध भूमिका मालिका, चित्रपटातून मनोज जोशी यांनी साकारल्या आहेत.

‘अमित शाहांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला. मी आतापर्यंत साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असणार आहे ‘, असा विश्वास मनोज जोशी यांनी व्यक्त केला आहे.

गुजरातच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रपटाचे शूटींग होणार आहे. विवेक ओबेरॉय, मनोज जोशी यांच्याशिवाय बोमन इराणी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता, जरीना वहाब हे सगळे यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अभिनेत्री बरखा बिष्ट नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!