वायकॉम १८ चे वूट वर “स्टुपिड मॅन स्मार्ट फोन ” हा आपला पहिला सर्व्हायवल शो ची पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाची हवा सर्वत्र पसरलेली असताना आता ह्या शो च तिसरं पर्व सुरु झालेलं आहे . अरुणाचल प्रदेशाच्या घनदाट जंगलात कॉमेडियन सुमित व्यास सोबत सुपरस्टार करण कुंद्रा हे दोघे अडकलेले आहेत .

करण आणि सुमित ह्या दोघांचा प्रवास हा सुंदर डोंगरदऱ्यातून पार होत जातो त्या दोघांनी आपल्या प्रवासामध्ये तराफा बांधण्यापासून ते तंबू बांधण्यापर्यंतची कामं केललं आहे . ह्या शो बद्दल करण म्हणतो ,” जेव्हा आम्ही तंबू बांधत होतो तेव्हा खूप अंधार होता आणि सोबतच मुसळधार पावसाची सुरुवात झालेली होती आणि हे खूप आव्हानात्मक होत आणि तितकंच अवघडही ”

नदी पार करण्यासाठी त्यांनी स्वतः बनवलेल्या तराफ्यामधून करण आणि सुमित दोघेही पडले . आणि सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुमित आणि करण एका मोठ्या दगडात अडकले आणि शो च्या टीम ला त्यांना वाचवण्यासाठी अशक्य होत होत .

LEAVE A REPLY

*