Type to search

हिट-चाट

फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलला अटक होण्याची शक्यता

Share

मुंबई : अमिषा पटेल पुन्हा एकदा अडचणीमध्ये आली आहे. एका चित्रपट निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रांची न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंट जारी केलं आहे. अमिषावर 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका निर्मात्याने केला आहे. एका चित्रपट निर्मात्याने अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आला. एका चित्रपटासाठी या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी अमिषाने दोन चेक दिले, मात्र हे दोन्ही चेक बाऊन्स झाले. चेक बाऊन्स झाल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयामध्ये सोमवारी सुनावणी करण्यात आली. न्यायालयाने अमिषाविरोधात वॉरंट जारी केलं आहे.

त्यासोबतच या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.देसी मॅजिक या चित्रपटासाठी अमिषा आणि कुणालने चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांच्याकडून 2.5 कोटी रुपये घेतले होते. 2013 साली या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती आणि 2018 साली हे चित्रीकरण पूर्ण होणार होतं. या चित्रपटातून मोठा फायदा होणार असून अमिषाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण पैसे परत देणार होती. मात्र अमिषाने अद्यापही हे पैसे परत केले नाहीयेत, असं अजय कुमार यांनी सांगितलं. अमिषाचा हा चित्रपट आजतागायत प्रदर्शित झाला नाही. दरम्यान, अजय कुमारसिंह यांचे वकील गोपाल कृष्ण सिन्हा यांनी दोघांच्याविरोधात न्यायालयात गैर जमानती वारंट दाखल करण्याची विनंती केली आहे. लवकरच रांची पोलीस अमिषा पटेला अटक करु शकता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!