इच्छाशक्ती हवी, ध्येय आपोआप साध्य होते – रश्मी बन्सल

0
नाशिक । या जगात कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. ध्येयसाध्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यास यशस्वी होण्याचा मार्ग अधिक सुलभ होते. असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि लेखिका रश्मी बन्सल यांनी केले. त्या मोमेंटम या व्यवस्थापनाचे धडे देणार्‍या संस्थेच्या वर्धापनदिनी नाशिक इंजिनियरींग क्लस्टर येथे बोलत होत्या.

याप्रसंगी मोमेंटमचे संस्थापक संचालक गजेंद्र मेडी, एच आर कल्सटंट विनोद बिडवईक, उद्योजक हेमंत राठी, रावसाहेब पाटील, मिलींद जाभोलकर, जितेंद्र शिर्के, आशिष वर्मा, नितीन बस्ते, लिना पाखलकर आदी उपस्थित होते.

यावेळी रश्मी बन्सल म्हणाल्या, क्षेत्र कुठलेही असो त्यासाठी गुंतवणूक, कर्मचारी त्यांचा मोबदला त्यातून मिळणारे उत्पन्न यांचे सुयोग्य नियोजन असेल तर कधीही अपयश येत नाही. स्वतःचा व्यवसाय थाटायचा असेल तर लोकल ते ग्लोबल विचार करायला हवा. हे जग खुप मोठे आहे, काहीजन राहतो त्याच परिसरातला विचार करून आपला उद्योग थाटतात. त्यांनाही यश येते, मात्र ते मर्यादित राहते. त्याची व्याप्ती वाढवली तर सातासमुद्रापार पोहोचण्यासाठी आपल्याला कुणीही रोखू शकत नाही.

बन्सल यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करत त्यांनी लिखीत स्टे हंग्री स्टे फुलीश, अराईस अवेक, कनेक्ट टू डॉटस् अशी पुस्तके लिहीण्यामागचे काही प्रसंग त्यांनी यावेळी सांगितले. अनेक उद्योजगांची उदाहरणे देत त्यांनी काही चित्रफीतीच्या माध्यमातून लक्ष वेधले.

नाशिकमधील अनेक तरुण उद्योजक यावेळी उपस्थित होते त्यांच्याशीही बन्सल यांनी संवाद साधला. बन्सल यांचे मनोगत संपल्यानंतर अनेकांच्या शंकांचे निरसन यांवेळी बन्सल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता पिंगळे, शितल पाटील यांनी तर आभार मेधा साईखेडकर यांनी मानले.

कर्मचारी हितातून उद्योग विकास : उद्योग उभारल्यानंतर व्यवस्थापनाचे अनेक आ

व्हाने उभी ठाकलेली आहेत. व्यापाराच्या दृष्टीकोनातून विचार व्हायला हवा. कर्मचार्‍यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टी

कोनातून व्यवस्थापन आणि कौशल्य कार्यशांळांचे आयोजन करणे. कर्मचारी निवडल्यानंतर त्यांचे समाधान होईल असा मोबदला. या सर्व गोष्टींचा विचार करून कंपनीचे हित साध्य करण्यासाठी सुयोग्य नियोजन कसे केले जाईल याकडे लक्ष दिले जायला हवे.
विनोद बिडवईक, एचआर कंन्सलटंट, नाशिक

LEAVE A REPLY

*