१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपीला दुबईतून अटक

0
दुबई – 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अन्य एका आरोपीसह दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या मोस्ट वाँटेंड आरोपीची ओळख अबू बकर अशी पटली असून, त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. तसेच आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोेटाच्या कटामध्ये तो सहभागी होता. दरम्यान, अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

अबू बकर याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या फिटोज नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांकडून दुबई येथे करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या दोघांना प्रत्यार्पणानंतर भारतात आणले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा खास हस्तक आहे. बॉम्बस्फोटापूर्वी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात असल्याचे बोलले जाते. अबू बकर गेल्या अनेक वर्षांपासून यूएईत वास्तव्यास होता.

12 मार्च 1993 रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा 2017 साली मृत्यू झाला होता.

 

LEAVE A REPLY

*