Friday, May 3, 2024
Homeनाशिककोटंबी घाट मृत्यूचा सापळा; उतारावर वाहनचालक वाहने न्युट्रल करतात; कारवाईची मागणी

कोटंबी घाट मृत्यूचा सापळा; उतारावर वाहनचालक वाहने न्युट्रल करतात; कारवाईची मागणी

पेठ | प्रतिनिधी Peth

नाशिक – पेठ महामार्गावरील (Nashik Peth Highway) कोटंबी घाट (Kotambi Ghat) अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. येथील एकाच वळणावर दरदिवशी काही न काही दुर्घटना घडत असतात…

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) चकाचक झाल्यानंतर वाहनांचे वेग वाढले आहेत. त्यामुळे येथील धोक्याच्या वळणावर अनेक वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे येथील अपघाताचे सत्र संपताना दिसत नाही.

अपघात झाल्यानंतर रीतसर गुन्हा दाखल (Complaint registerd) करणे इतपतच प्रशासकीय कार्य असले तर वाहन चालकांना वाली कोण असा प्रश्न उभा ठाकला आहे. या घाट वळणावरुन अवजड वाहतुक होत असते. तसेच अनेक ट्रक चालक रस्ता उतरामुळे वाहन न्युट्रेल गिअरमध्ये चालवत असतात.

डिझेल वाचविणे हा उद्देश असला तरीही इंजिन बंद असल्यावर वळणावर वाहन नियंत्रण सोडते. म्हणूनही अपघात झालेले असून याठिकाणी अपघात घडल्यास मोठ्या वाहतुक कोंडीचा फटका देखील बसलेला आहे. या मार्गावरील अपघातग्रस्त जागेपासुन २ कि.मी. वर आरटीओचे चेक पोस्ट आहे. मात्र, त्यांनीही कधी अपघात घडणे मागील कारणमिमांसा जाणून घेऊन कठोर कारवाई केली नाही.

येथील हे वळण दुरुस्त करण्यास मोठा वाव असतांना त्याचा साधा विचारही शासन यंत्रणेकडून होतांना दिसत नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या