नगर-औरंगाबाद रोडवर ट्रकला पाठीमागून ट्रक धडकली; चालक ठार, क्लिनर जखमी

0

देवगड फाट्यानजीक पहाटेची घटना; जखमी व मयत शिक्रापूर येथील

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यानजीक काल रविवारी पहाटे नगरहून औरंगाबादच्या दिशेने चाललेल्या ट्रकवर मागून आलेली ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातात मागील ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाल्याची घटना घडली असून मयत चालकावर अपघातास व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यापासून पुढे एक किलोमीटरवर नगर-औरंगाबाद रोडवर पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास दोन ट्रकची धडक झाली. एमएच 12 एचबी 4509 या ट्रकचा चालक विनोद ज्वाला वर्मा (वय 32) रा. शिक्रापूर जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला. तर याच ट्रकचा क्लिनर राहुल रामनिवास यादव (रा. शिक्रापूर, जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला.

याबाबत दुसरी ट्रक एमएच 11 एएल 5653 वरील चालक शंकर कृष्णा पाटखील (वय 47) रा. रिळे ता. शिराळा जि. सांगली याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझ्याकडे अशोक लेलंड कंपनीची 10 टायर ट्रक असून ती मी स्वतः चालविली. शिरवळ खंडाळा (जि. सातारा) येथील एशियन पेंटस् मधून रंगाचे डबे भरुन ते अकोला येथे खाली करण्यासाठी निघालो होतो.

30 जुलै रोजी पहाटे औरंगाबादचे दिशेने देवगड फाट्यीाच्या पुढे जात असताना अचानक पाठीमागून येणार्‍या एका ट्रकने माझ्या ट्रकला मागून जोाराची धडक दिल्याने अपघात होवून माझी ट्रक रोडच्या साईडला असलेल्या डिव्हायडरवर जावून डायव्हर साईडचे पुढील टायर फुटले. त्यानंतर मी खाली उतरून पाहिले असता मागील ट्रक क्र. एमएच 12 एचबी 4509 असा होता. त्या ट्रकमधील चालक जागीच मयत झाला होता. त्याचे नाव विनोद ज्वाला वर्मा (वय 32) असल्याचे समजले व जखमी झालेल्या क्लिनरचे नाव राहुल रामनिवासयादव हा जखमी झाला असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना दवाखान्यात पाठविले. सदर अपघातात दोन्ही वाहनांचे व माझ्या गाडीतील एशियन पेन्टच्या डब्यांचे नुकसान झाले.

वरील फिर्यादीवरुन नेवासा पोलीसांनी मयत विनोद वर्मा याच्यावर अपघास कारणीभूत ठरुन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा रजिस्टर फर्स्ट 384/17 भारतीय दंड विधान कलम 304(अ), 279, 337 427 मोटार वाहन कायदा कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेडकॉनस्टेबल शैलेंद्र ससाणे करत आहेत.

LEAVE A REPLY

*