Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: चास शिवारातील अपघातात सुप्यातील तीन युवक ठार तर एक जखमी

Share

सुपा (वार्ताहार)- नगर-पुणे हायवेवर चास शिवारात बुधवारी रात्री झालेल्या भिषण आपघातात सुप्यातील ग्रामपंचायत सदस्य सह तीन जण ठार झाले असुन एक जण गंभिर जखमी आहे.

बुधवारी रात्री 12.30 दरम्यान नगर-पुणे हायवेवर चास शिवारात हॉटेल संजय जवळ झालेल्या भिषण अपघातात सुपा ग्रामपंचायत सदस्य संदीप किसन पवार, भरत भाऊसाहेब ननवरे, श्रीकांत शिर्के हे जागीच ठार झाले. तर साहील पठान हे गंभीर जखमी आहेत. पोलिस सुञांकडून मिळालेल्या माहिती नुसार बुधवरी रात्री ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार आपल्या सहकार्यासह नगर येथुन आपल्या मारुती स्विफ्ट गाडीने सुप्याकडे येत आसताना चास शिवारात रोडवरच एक मालवाहतुक ट्रक नादुरुस्त होऊन उभा होता.

रात्रीची वेळ वळण व गाड्याच्या प्रकाशात अंदाज न आल्याने पवार याची गाडी उभ्या ट्रकच्या पाठिमागुन धडकली गेली. यात संदीप पवार, भरत ननवरे व श्रीकांत शिर्के हे तीन युवक जागीच ठार झाले तर साहील पठान गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. आपघाताचे वृत्त सुपा परिसरात समजताच सुप्यावर शोककळा पसरली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!