कारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

0

सोनेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव संगमनेर रोडवर झगडे फाटा शिवारात कारने दिलेल्या धडकेत वंजारवाडी मनमाड येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. वंजारवाडी मनमाड येथील रहिवासी संजय पुंडलिक जाधव व पत्नी संजीवनी पुंडलिक जाधव हे दाम्पत्य पोहेगाव मार्गे आपल्या बजाज कंपनीच्या (एमएच-15-एएन-3827) मोटारसायकलवरून कोपरगावकडून वंजारवाडीला जात असताना समोरून येणार्‍या (आय-20-एमएच-17-एझेड-9423) या कारने झगडे फाटा शिवाराजवळ चव्हाण वस्ती नजीक जोराची धडक दिली.

त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी घटनेची खबर कोपरगाव पोलिस स्टेशनला देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आय 20 कारचा चालक पसार झाला होता. मृतदेह शवविछेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*