सिन्नर- शिर्डी महामार्गावर लष्करी जवानासह एकाचा मृत्यू

0
सिन्नर / अजित देसाई : शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात आज (दि.29) सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात लष्करी जवानासह एका तरुणाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

बाळासाहेब अशोक वाजे (26) असे मृत जवानाचे नाव असून तो तालुक्यातील डूबेरे येथील रहिवासी होता. सुट्टीवर सध्या तो घरी आलेला होता.

त्याची सासरवाडी पांगरी येथील असल्याचे समजते. विशाल चंद्रभान वेताळे (18) रा. वरझडी ता. संगमनेर हा दुसरा युवक या अपघातात ठार झाला. आई संगीता वेताळे यांच्यासोबत तो आपल्या दुचाकीवरून जात होता.

LEAVE A REPLY

*