डंपर-दुचाकीच्या अपघातात कानमंडाळे येथील युवक ठार

0

देवळा (प्रतिनिधी) | शहरातील वाजगाव रस्त्यावर आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वळण रस्त्यावर डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. अधिक माहिती अशी की डंपर (क्र.एम एच ४१ -ए जी ५५०८ ) व मोटारसायकल ( एम एच १५ — डी जे ३६१३) वळणाचा अंदाज न आल्याने एकमेकांना समोरा-समोर धडकले.

या अपघातात मोटारसायकलस्वार गुलाब साहेबराव आंबेकर ( वय २१, रा.कानमंडाळे ता.चांदवड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पो.नि.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

*