मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच पोलीस वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

0
मुंबई |  वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेले असता अपघात होऊन जागीच ठार झाले.  पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातात ठार झालेल्या वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्याचे नाव अतुल घागरे असल्याचे समजते. ज्या ठिकाणी घागरे कर्तव्य बजावत होते त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी हजर होता.

नियमित वाहतूक कोंडीच्या ठिकाणी केवळ एकाच कर्मचाऱ्याला का पाठवले असावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच वाहतूक शाखेतील कर्मचार्यांमध्येही संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मयत घागरे यांची पत्नीही पोलीस खात्यात असून त्या रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस आहेत.

दुर्दैव म्हणजे, आज अतुल यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांचे निधन झाल्यामुळे घागरे कुटुंबियांना धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

*