मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; महिला ठार; दोन गंभीर जखमी

0
मुंबई आग्रा महामार्गावरील रायगड नगर शिवारात ट्रॅक्टर आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील रायगड नगर येथील वालदेवी पुलाजवळ घोटी टोल प्लाझाचे कंत्राटी कर्मचारी महामार्गावरील गवत काढण्याचे काम करण्यासाठी ट्रॅक्टरने ( ट्रॅक्टर क्र MH 18 A 94 ) नाशिकहुन जात असतांना कंटेनर ( कंटेनर क्र. GJ 15 AS 1078 ) मागुन जोरदार धडक दिल्यामुळे टॅक्टर मधील एक महीला सरला मालुंजकर (वय ३१, रा. वाडीव-हे) ठार झाली.

तर नंदुभाऊ माळी (वय ४५) व आनंदा वाळु गोहिरे (वय ४२) रा. रायगड नगर हे जबर जखमी झाले. या अपघाताची माहीती समजताच नरेंद्राचार्य संस्थानचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अधिक तपास वाडीवऱ्हे पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*