Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Share

निमगावजाळी (वार्ताहर) – दुधाचा टँकर व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील आरोग्य केंद्राच्या समोर काल संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

यादव नाथा चतुर्भुज (रा. नाशिक रोड, देवळाली) असे मृताचे नाव आहे. चतुर्भुज हे त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल क्रमांक एम. एच. 23 ए. क्यू. 3475 हून लोणीहून संगमनेरकडे येत होते. निमगावजाळी शिवारातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरून जात असताना संगमनेरकडून लोणीकडे जाणारा प्रभात डेअरीची दूधाचा टँकर क्रमांक एम. एच. 17 बी. डी. 5139 याने ओव्हरटेकच्या नादात समोरून येणार्‍या मोटारसायकलला धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अपघाताची माहिती कळताच निमगावजाळीचे पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली. अपघात घडताच वाहतूक ठप्प झाली होती. पत्रकार राजेंद्र थेटे, रामभाऊ भोसले, जाधव, नंदू डेंगळे, भाऊ डेंगळे यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!