कावनईजवळ अपघात; एक ठार; वाहतूक ठप्प

0
कावनई | मुंबई-आग्रा महामार्गावर टाके घोटी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात एक अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या कंटेनर आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री टाकेघोटी शिवारात अपघात झाला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा झाला.या अपघातात ट्रेकमधील एक अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाली.

या अपघातामुळे मुंबईहुन नाशिककडे जाणारी वाहतूक दोन तासाहुन अधिक काळ  ठप्प झाली. यामुळे वाहनाच्या चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इगतपुरी पोलीस आणि टोल नाका कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

चालते वाहन पेटले : दरम्यान याच ठिकाणी दुपारच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या ओम्नी वाहनाने अचानक पेट घेतला. चालत्या वाहनातून धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबवून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

LEAVE A REPLY

*