Video : अशोकस्तंभजवळ मिनीबसचे ब्रेक फेल; दुचाकीस्वार गंभीर जखमी

0
नाशिक |  अशोक स्तंभ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या यशवंती या मिनी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

इगतपूरी-नाशिक मिनीबस क्रमांक एम.एच.०७ सी ७६९५ ही बस सीबीएसककडून पंचवटीकडे जात असतांना अचानक ब्रेक फेल झाले. त्यानंतर ही बस तीन वाहनांना धडकली. मिनीबसच्या पुढच्या चाकात दुचाकी आल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

दुचाकी क्र.एमएच.१५ बीएम २७११ दुचाकीचे नुकसान झाले असून मारुती स्विफ्ट कार क्र. एम.एच १५ एफएफ १२६४ धडक दिल्याने या कारचेही नुकसान झाले आहे. अपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वाराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, इगतपुरी-नाशिक बस अशोकस्तंभावर आलीच कशी? अशी चर्चा परिसरात होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पोलीस चौकशी करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*