Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंप्परने पोलिसाला चिरडले

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंप्परने पोलिसाला चिरडले

चालकासह पाच जणांवर खूनाचा गुन्हा

खामगाव/शेगाव । प्रतिनिधी

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंप्परचा पाठलाग करणार्‍या पोलिसाला चिरडून खून करणार्‍या डंप्पर चालकासह 5 जणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि. 29 रोजी सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास माटरगाव-वरद रस्त्यावर घडली.

- Advertisement -

लॉकडाऊनची स्थिती असतांनाही बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. भास्तन गावाजवळील पुर्णा नदीच्या काठावरून एक डंप्पर क्र. (एमएच-28 बीबी-4923) या वाहनाने वाळू घेवून खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलीस स्टेशनचे पोकॉ उमेश रमेश सिरसाट यांना मिळाली.

त्यामुळे पोकॉ उमेश सिरसाट व होमगार्ड असे दोघेजण मोटार सायकलने निघाले व भरधाव वेगाने येणार्‍या डंप्पर चालकाला हात दिला असता डंप्पर चालकाने आपल्या ताब्यातील डंप्पर वाहन पोकॉ उमेश सिरसाट यांच्या अंगावरून नेले.

त्यामध्ये सिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी होमगार्ड श्रीकृष्ण त्र्यंबक वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंप्पर चालक विशाल गवळी रा.कठोरा व डंप्पर मालक भारत सुधाकर मिरगे रा.भास्तन व तिघांविरूध्द पोलिसांनी कलम 302, 353, 143, 109 नुसार गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. उमेश सिरसाट यांचे 20 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या