Type to search

जळगाव

पाळधीजवळ बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Share
जळगाव – 
स्ता ओलांडून मोटारसायकलने पलीकडे जात असताना शिवशाही बसने दुचाकीला धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी 4.30 वाजता पाळधी बायपासजवळ घडली. याबाबत पाळधी पोलीस दूरक्षेत्रात नोंद झाली. पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून चालक पोलिसांना शरण आला आहे.
हुकुमचंद केशव पाटील (वय 50, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा. ह.मु. शिव कॉलनी, जळगाव) हे विद्यापीठ जवळ असलेल्या आनंद गिरधारीलाल ओसवाल यांच्या शेतातून केळीची गाडी भरुन पाळधी बायपास जवळील हॉटेल जयश्रीनजीकच्या तोल काट्यावर वजन करुन पुन्हा शेतात मोटारसायकल (क्र. एमएच 19 पीपी 1751) ने जात होते. याप्रसंगी धुळ्याकडून जळगावकडे येणार्‍या शिवशाही धुळे-जळगाव बस (क्र. एमएच 18 बीजी 2733) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
 गंभीर जखमी असलेले मोटारसायकलस्वार हुकुमचंद पाटील यांना महामार्गावरील काही जणांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात हलवले. परंतु, जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे व ते अत्यवस्थ असल्याने खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी जखमीस जिल्हा रुग्णालयात  हलवण्याचा सल्ला दिला.
जिल्हा रुग्णालयात जखमी पाटील यांना आणले असता त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. विशेष म्हणजे अपघाताप्रसंगी हेल्मेट असताना देखील पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागला. पाटील हे टाकरखेडा येथील एका फार्म हाऊसवर मॅनेजर म्हणून कामाला होते. बसचालक महेंद्र आधार चौधरी (वय 25, रा.खेडी कढोली, ता.एरंडोल) हे पाळधी येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलिसांना शरण गेले आहेत.
रुग्णालयात कुटुंबीयांचा आक्रोश
 
पाटील यांच्या मृत्यूबाबत कळताच कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.  नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी हर्षाली, मुलगा राहुल असा परिवार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!