टाटा छोटा हत्ती व महिंद्रा पिकअपच्या धडकेत चौघे गंभीर
Share

निमगावजाळी (वार्ताहर)- लोणी – संगमनेर रस्त्यावर छोटा हत्ती व महिंद्रा पिकअप जीप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात समृध्दी मंगल कार्यालयासमोर शनिवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडला.
टाटा छोटा हत्ती क्रमांक एम. एच. 17 वी. डी. 3627 हा संगमनेरहून लोणीकडे जात होता तर महिंद्रा जीप क्रमांक एम. एच. 12 ई. क्यु. 7786 ही लोणीहून संगमनेरकडे चालली होती. या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.
टाटा छोटा हत्तीमधील अशोक गुलाबराव गंगुसे, सचिन अशोक गंगुसे, मिना अशोक गंगुसे, सचिन पंढुरे (सर्व रा. कोल्हार) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती निमगावजाळीचे पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी आश्वी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रवरा रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्रवरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.