Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नविन कसारा घाटात कांद्याने भरलेला कंटेनर खोलदरीत कोसळला; चालक जागीच ठार

Share
नविन कसारा घाटात कांद्याने भरलेला कंटेनर खोलदरीत कोसळला; चालक जागीच ठार, accident at new kasara ghaat driver dies breaking news

इगतपुरी । दि. ३० प्रतिनिधी

देशात सर्वत्र संचारबंदी लागू असल्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. नाशिकहून पनवेलच्या दिशेने जाणारा कांद्याने भरलेला कंटेनर नवीन कसारा घाटात चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

रात्रीच्या सुमारास नाशिकहुन पनवेल येथे एक कांद्याने भरलेला कंटेनर क्रमांक.MH.06-AC.5920 हा नविन कसारा घाटातून भरधाव वेगाने चालला असता ब्रेकफेल पॉईंट जवळील वळणाचा अंदाज न आल्याने येथील खोल दरीत कोसळला.

या अपघातात कंटेनर चालक ब्रिजेश तिवारी वय अंदाजे 32 वर्षे रा.उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक.अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डांगले, पो.ना.जितेंद्र पाटोळे,पो.ना.पाटिल,पो.कॉ खालकर,पो.कॉ लगद आदी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!