नगरचे व्यापारी सागर कटारिया यांच्यासह पत्नीचा अपघाती मृत्यू

0

 दोन मुले गंभीर जखमी
अहमदनगर (प्रतिनिधी) –
नगर कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यात गायमुखेवाडी येथे नगरचे व्यापारी सागर जवाहरलाल कटारिया व त्यांची पत्नी श्‍वेता कटारिया यांच्या वाहनाचा अपघात झाला. यात पतीपत्नी जागीच मृत्यू झाले असून त्यांची दोन मुले गंभीर जखमी आहेत. दोघांवर एका खाजगी रुग्णायात उपचार सुरू आहेत.

सागर कटारीया हे नगर शहरातील सारसनगर परिसरात राहणारे होते. त्यांची नगरमध्ये औषध एजन्सी आहे. कटारिया हे काही कारणास्तव कुटुंबासह कल्याणला गेले होते. मंगळवारी (दि.20) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगरकडे येत असताना जुन्नर तालुक्यातील गायमुखेवाडी ते पिंपरी पेंढार या दरम्यान असताना मारुती आल्टो (एम. एच 16 एटी 7843) व इनोव्हा कारचा (एम. एच 05 सीएच 6001) समोरासमोर अपघात झाला. यात सागर व त्यांची पत्नी श्‍वेता ही दोघे जागीच मृत्यू झाले आहे. तर त्याचे मुलगा व मुलगी हे जखमी असल्याचे पाहुन प्रवासी व स्थानिक नागरिकांनी दोघांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना ओतूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. कटारिया यांच्या मुलांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नाच्या वाढदिवशीच काळाचा घाला…
सागर व श्‍वेता कटारिया यांच्या लग्नाचा काल मंगळवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे नगरकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*