जीवन प्राधिकरणचा शाखा अभियंता लाच घेताना जेरबंद

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपरगाव येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता यांची प्रतिनियुक्ती कोपरगाव नगरपालिकेत शाखा अभियंता म्हणून असलेले प्रकाश लक्ष्मण लोखंडे यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांचे कन्स्ट्रक्शन कंपनीला कोपरगाव नगरपालिका पाणी पुरवठा शुध्दीकरण प्रकल्पाच्या देखभालीचा ठेका मिळाला आहे. तक्रारदार यांनी माहे डिसेंबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीतील प्रकल्पाच्या देखभालीचे मासिक बिले कोरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सादर केली होती.
त्यावेळी कोपरगाव जीवन प्राधिकरण कार्यालयाचे शाखा अभियंता आलोसे प्रकाश लक्ष्मण लोखंडे यांनी सदर बिले मंजूर केली असता. ती तक्रारदार यांना अदा करण्यात आलेली आहेत. या मंजूर केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला.
तक्रार येताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने कोपरगाव येथे सापळा रचला. लोखंडे यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ती पुणतांबा फाटा येथील एका हॉटेलसमोर घेण्याचे ठरले. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा लावून लोखंडे यांना लाच घेताना जेरबंद केले. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात लोखंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील लाचलुपचपत पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

*