नानेगावचा लाचखोर तलाठी जाळ्यात

0
नाशिक । सातबार्‍यावर पिकफेर्‍याची नोंद करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना नानेगाव येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ अटक केली.

सुनील अमृत चांडोले असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी नानेगाव तलाठी कार्यालयात सापळा रचून पैसे स्विकारताच त्या ताब्यात घेतले.

तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर पिकपेर्‍याची नोंद करावयाची होती. त्यासाठी 14 नंबरचा फार्म भरून नाशिक तहसिल कार्यालयास पाठवायचा होता. त्यासाठी तक्रारदाराने नानेगावचे तलाठी संशयित सुनील अमृत चांडोले याची भेट घेतली असता, तलाठी चांडोले याने 2 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार व तलाठी चांडोले यांच्यात तडजोडीअंती 500 रुपये लाचेची रक्कम ठरली. त्यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज नानेगाव तलाठी कार्यालयात सापळा रचला होता.

ठरल्याप्रमाणे, सदरील लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना तलाठी चांडोले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*