Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृ. उ. बा. समिती सभापती शिवाजी चुंभळेंची रवानगी सेन्ट्रल जेलमध्ये? घरात सापडले अडीच लाखांचे विदेशी मद्य आणि २२ तोळे सोनं

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या बदल्यात तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलाकडून त्यांची पोलीस कोठडी  टळली मात्र, यावर न्यायालयाकडून स्टे आल्यामुळे चुंभळे यांची रवानगी लवकरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चुंभळे यांचा रंगेहात ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने काल (दि. १७) दुपारपासूनच त्यांच्या राहत्या घरी तपासणी केली. यामध्ये तब्बल २२ तोळे सोनं, १ किलो चांदी आणि अडीच लाख रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.

चुंभळे यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या एसीबीने तीन पथकांच्या माध्यमातून कारवाई सुरु केली. आज पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.

दरम्यान, आज चुंभळे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांच्या वकिलांनी चुंभळे यांना श्वसनाचा त्रास असून त्यांना रात्री वेंटीलेटर लाऊन झोपावे लागते असे सांगितले. यानंतर मात्र, त्यांच्या कोठ्डीवर स्टे आला असून त्यांची रवानगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

चुंबळे यांचा व्हाईस रेकॉर्ड घेणे, यातील त्यांचे सहआरोपींचा शोध घेणे या अनुशंघाने बाजार समितीतील कागदपत्रांची तपासणी यासह अधिक चौकशी बाकी असल्याने पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसीबी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!