सहाय्यक लेखाअधिकारी ८ हजारांची लाच घेतांना जाळ्यात

0
त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) | येथील पंचायत समितीचा सहाय्यक लेखाधिकारी एस.एन.शिंपी यास ८ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. सेवानिवृत्त्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे 67 हजार रु. वेतन वाढीची फरकाची रक्कम काढून देण्यासाठी लाच मागितली असल्याची माहिती समोर येत आहे.

सहाय्यक लेखा अधिकारी चतुर्भुज झाल्याने त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली असून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

*