शेंदवडच्या ग्रामसेविका लाच घेतांना गजाआड

0

पिंपळनेर । वार्ताहर- सात हजार रूपयांची लाच घेणार्‍या शेंदवड (ता. साक्री) येथील ग्रामसेविका ज्योती गांगुर्डे यांना आज दुपारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

तक्रारदार यांनी 14 व्या वित्त आयोग योजनेंतर्गत केलेल्या कामावर देखरेख केल्याच्या व केलेल्या कामाचा धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात शेंदवड (ता. साक्री) येथील ग्रामसेविका ज्योती तेज्या गांगुर्डे (वय 32) यांनी 10 हजार रूपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

त्यानुसार आज दुपारी एसीबीच्या पथकाने ग्रा.पं. कार्यालयात सापळा लावला होता. तेव्हा तडजोडीअंती तक्रारदाराकडून 7 रूपयांची लाच स्वीकारतांना पथकाने ज्योती गांगुर्डे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

*