Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचा लाचखोर पोलीस जाळ्यात

Share

नाशिक । प्रतिनिधी

कारवाईतील रिक्षा सोडून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच घेताना भद्रकालीतील पोलीस शिपायास लाचलूचपत प्रतिबंधक विभगााने रंगेहाथ पकडले.

दिनेश शेडजी चव्हाण असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. आज (ता.14) सायंकाळच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातच चव्हाण यास पकडण्यात आले.

भद्रकाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलीस शिपाई चव्हाण याने (एमएच 15 एफयु 2760) या क्रमाकांची रिक्षा जप्त केली होती. त्यामुळे तक्रारदार रिक्षाचालकाने रिक्षा सोडवण्यासाठी चव्हाणसोबत संपर्क केला.

त्यावेळी रिक्षा सोडवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे चव्हाणने एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

विभागाने तक्रारीची शहानिशा करून आज सायांकाळी सापळा रचला. चव्हाण याने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्यास पकडले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!