मंडलाधिकारी जाधव लाचलुचपतच्या जाळ्यात

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील नायगावचे मंडलाधिकारी अनिल कुंडलिकराव जाधव यांना जमिनीची रेकॉर्डला नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
नागयगाव मंडलातील खरेदी केलेल्या शेतजमिनीची रेकॉर्डला नोंद करण्यात यावी यासाठी तक्रारदार यांचे वडील व चुलते यांना मंडलाधिकारी अनिल जाधव (वय 45 मुळ. रा. पानगाव, उस्मानाबाद) याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली.
त्यांनतर तहसील परिसरात असणार्‍या मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावून पंचांसमक्ष गुरूवारी पाच हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी जाधव यांना रंगेहाथ पकडले. नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार, नितीन दराडे, एकनाथ आव्हाड, तनवीर शेख, दत्तात्रय बेरड, सतीश जोशी, पोलीस नाईक प्रशांत जाधव, अंबादास हुलगे यांनी ही कारवाई केली. लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*