सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस लाच घेताना पकडले

0

अंगवणवाडी सेविका नियुक्ती आदेशासाठी मागितली लाच

अहमदनगर (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुका पंचायत समितीमध्ये कार्यरत असणार्‍या सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी चित्रा वसंत भारती यांना अंगवणवाडी सेविका नियुक्ती या पदाचा आदेश देण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांना वेदवस्ती , देऊळगाव गलांडे ता. श्रीगोंदा जि. अ. नगर येथील रिक्कत असलेल्या अंगणवाडी सेविका या पदाचा नियुक्ती आदेश देण्यासाठी यातील आरोपी सहायक बालकविकास प्रकल्प अधिकारी चित्रा वसंत भारती यांनी आपल्या कार्यालयात 5 हजार रुपयाची मागणी करून ती स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

या कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, पोलीस उपअधिक्षक विष्णु ताम्हणे, पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पो. हे. कॉ. राजुु सावंत, सुनिल पवार, वाव्हळ, शेख, तनवीर, दत्तात्रय बेरड, पो. ना. नितीन दराडे, पो. ना. प्रशांत जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान जर शासकीय नोकरी काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुपच प्रतिबंंधक विभाग अहमदनगर यांचेशी संपर्क साधावा असे आवहान पोलीस उपअधिक्षक विष्णू ताम्हणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*