जिल्हा बँकेच्या परीक्षेला 1965 उमेदवारांची दांडी

0

बँकेच्या संकेतस्थळावर नमुना उत्तरपत्रिका देणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या विविध संवर्गातील रिक्त 465 जागांसाठी शनिवारी आणि रविवारी नगरमध्ये लेखी परीक्षा झाली. ही भरती प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण जबाबदारी बँकेच्यावतीने पुण्याच्या नायबर या संस्थेवर सोपवण्यात आली होती. या संस्थेने दोन दिवस नगरमध्ये लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडली असल्याचा दावा जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आला.

बँकेने कर्मचारी आकृतीबंध मंजूर केल्यानंतर रिक्त असणार्‍या जागांवर भरतीसाठी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाबार्डकडून परवानगी घेण्यात आली. बँकेत प्रथम श्रेणी अधिकार्‍यांच्या 7, व्दितीय श्रेणी अधिकार्‍यांच्या 63, ज्युनिअर ऑफीसरच्या 236 आणि लिपीकांच्या 159 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी ऑनलाई अर्ज मागवण्यात आले.

शनिवारी प्रथम श्रेणी अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा झाली. त्यानंतर रविवारी उर्वरित सर्व पदासाठी लेखी परीक्षा झाली.सकाळच्या सत्रात नगर शहरातील 25 केंदAावर झालेल्या लेखी परीक्षेला 9 हजार 839 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 651 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. यावेळी 1 हजार 188 उमेदवार गैरहजर होते. दुपारच्या सत्रात शहरातील 15 केंद्रावर 7 हजार 85 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 308 जणांनी परीक्षा दिली आहे. या वेळी 777 परीक्षार्थी गैरहजर होते. बँकेच्या 465 जागांसाठी झालेल्या लेखी परीक्षेला 1 हजार 965 उमेदवारांनी दांडी मारली.
………..
शहरातील सर्व महाविद्यालय, मोठ्या शाळा, भिंगार, एमआयडीसी, नागापूर या ठिकाणी परीक्षेसाठी केंंद्र होते. परीक्षा संपल्यानंतर शहरातील विविध भागात वाहतूक कोंडी झाली. परीक्षा झाल्यानंतर बँकेच्या संकेतस्थळावर नमुना उत्तरपत्रिकेची अन्सर की ओपन केली जाणार आहे. त्यावर उमेदवारांना आपल्या उत्तरपत्रिकेच्या कार्बन प्रतींवरील उत्तरांची पडताळणी करता येणार आहे.
………

LEAVE A REPLY

*