अध्यात्मातच मानसिक ताकद देण्याची क्षमता : आ. थोरात

0
संगमनेर (प्रतिनिधी)-शिक्षण व विद्वतेला आध्यात्माची जोड दिल्याने मानसाला सर्वोच्च यश मिळते. सुख व शांती बरोबर प्रत्येक मनुष्याला मानसिक ताकद देण्याची क्षमता आध्यात्मातच असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना व अमृत सांस्कृतीक मंडळाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर अखंड हरिनाम सप्ताहात दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, शंकर पा. खेमनर, बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, चंद्रकांत कडलग, संपतराव डोंगरे, अभिजित ढोले, जगन आव्हाड, विलास वर्पे, बी. आर. चकोर, अवधुत आहेर, नानासाहेब शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, चंद्रलेखाताई काकडे, गोविंद महाराज करंजकर, अरुण फरगडे आदी उपस्थित होते. यावेळी आ. बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या हस्ते दीपप्रवलन करून स्व. सीताबाई दामोधर कुटे यांच्या स्मरणार्थ 325 ज्ञानेश्‍वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले.
भाऊसाहेब कुटे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली या सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. या सप्ताहात मातोश्री सीताबाई दामोधर कुटे यांच्या स्मरणार्थ आपल्या परिवाराने 325 ज्ञानेश्‍वरी ग्रंथ ह्या महिला भगिनींना पारायणासाठी दिले आहेत. प्रत्येकाने आध्यात्मिक मार्गाने जीवन जगल्यास जगात खर्‍या अर्थाने शांतता नांदेल असेही ते म्हणाले.
यावेळी अण्णा राहिंज, रामनाथ शिंदे, सोमनाथ जोंधळे, डॉ. गंगाधर चव्हाण, विलास वर्पे, सुभाष गुंजाळ, राजेंद्र कढणे, केशव दिघे, कार्याध्यक्ष बाबासाहेब वर्पे, विजय जगताप, श्री. शेनकर, किशोर देशमुख, किरण कानवडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबासाहेब वर्पे यांनी आभार मानले. यावेळी भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*