Type to search

दिवाळी - कविता

देशदूत काव्यकट्टा : अभिव्यक्त

Share

वेचून कलागुण तुझ्यातले
स्वतःला तू शोधत रहावे,
अनेकांतील एक राहून
अभिव्यक्त तू होत रहावे |

पुसलेले तुझेच विचार
नव्याने मांडत जावे,
शब्दांना पुनः कवेत घेऊन
अभिव्यक्त तू होत रहावे|

विसरलेल्या तुझ्याच गोष्टी
नकळत आठवत जावे,
पुनः स्मरणात ठेवण्यासाठी
अभिव्यक्त तू होत रहावे|

मिळालेल्या गोड आठवणींना
हृदयात साठवत जावे,
एकांतात त्यांच्यासोबत
अभिव्यक्त तू होत रहावे|

  • प्रियंका सरवार
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!