बिग बीसोबत पहिल्यांदाच काम करणार इम्रान हाश्मी

0

मुंबई- अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. बॉलिवूडमधल्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी बिग बींसोबत काम केलं आहे. आता पहिल्यांदाच इम्रान हाश्मी बिग बींसोबत काम करणार आहे. एका खासगी संकेतस्थळाच्या माहितीनुसार हा कोर्टरुम ड्रामा असू शकतो. आतापर्यंत ‘बदला’, ‘पिंक’सारख्या चित्रपटात अमिताभ बच्चन वकिलाच्या भूमिकेत दिसले आता आणखी एका चित्रपटात ते या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. रुमी जाफ्री या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. रुमी यांच्यासोबत बच्चन यांनी यापूर्वी गॉड तुस्सी ग्रेट हो चित्रपटात काम केलं होतं. गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांचा बदला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून यश लाभलं. तर काहीदिवसांपूर्वी बच्चन यांनी नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटाचंही चित्रीकरण संपवलं. आता बच्चन नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सज्ज झाले आहे. मे महिन्यात नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. चित्रपटाचं नाव आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरली नाही. मात्र इम्रानसोबत बिग बींची जोडी पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

*