Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

माजी महापौर कळमकरांसह 30 जणांविरोधात गुन्हा

Share

सरकारी कार्यालयाच्या आवारात दशक्रिया विधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- विजेचा धक्का लागून मृत झालेल्या संदेश आढाव या तरुणाचा दशक्रिया विधी सरकारी आवारात केल्या प्रकरणी पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर, अजय महाराज बारस्कर यांच्यासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसच यात फिर्यादी झाले. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अजित धस, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण खामकर, माजी महापौर अभिषेक कळमकर आणि इतर 30 अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल सचिन गोरे यांनी फिर्याद दिली आहे. जमावबंदी आदेशाचा भंग आणि 143,147,188 कलमान्वये गुन्ह्याची नोेंद केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील संदेश आढाव या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्याचा दहावा महावितरणच्या नगर कार्यालयात घालण्यात आला. मृत संदेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या एमएसईबीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी दशक्रिया विधी कार्यक्रमानंतर करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी आदेश लागू केलेला असतानाही त्याचे उल्लंघन करून गैर कायद्याची मंडळी जमविल्याचा आरोप आरोपीविरोधात ठेवण्यात आला आहे.

अभिषेक कळमकरांवर तिसरा गुन्हा दाखल
अभिषेक कळमकर यांनी आमदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी भवनातील राड्यात गुन्हा दाखल होता होता राहिला होता. पण पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत अभिषेक कळमकरांचे नाव आरोपीच्या यादीत घेतले. त्यापूर्वीही एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणात अभिषेक कळमकर हे आरोपी आहेत. म्हणजेच आतापर्यंत कळमकर यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!