Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

हवाईदल प्रमुखांसोबत अभिनंदनचे मिग २१ मधून उड्डाण

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी सोमवारी हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासोबत मिग २१ विमानातून उड्डाण केले.

पंजाबच्या पठाणकोठ एअरबेसवरून अभिनंदन आणि धनोओ यांनी मिग २१ मधून भरारी घेतली. एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ फायटर पायलट आहेत.

१९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी त्यांनी मिग-२१ मधून हल्ला करुन पाकिस्तानची रसद तोडली होती. अभिनंदन यांच्यासोबत धनोआ यांनी केलेल्या उड्डाणामुळे हवाई दलाला प्रेरणा मिळाले. देशातील परिस्थिती बघता हवाई दल अधिक सज्ज होईल असे म्हटले जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!