श्रीगोंदा : अपहरण झालेल्या वैभवचा 21 दिवसांनी मृतदेह सापडला

0
13 नोव्हेंबरला झाले होते अपहरण; घातपाताचा संशय
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण या गावातील वैभव ऊर्फ बालू बापू पारखे या साडेपाच वर्षाच्या मुलाचे दि. 13 नोव्हेंबर रोजी घराच्यासमोर खेळत असतांना अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह घराच्या जवळ उघड्यावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात या मुलाचा घातपात केला असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

साडेपाच वर्षाचा वैभव उर्फ बालू हा घरासमोरुण गायब झाल्याने त्याचे वडिलांनी फिर्याद दिली होती. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. श्रीगोंदा पोलीस या अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत होते परंतु तपासा दरम्यान कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. परंतु 4 डिसेंबर रोजी तब्बल 21 दिवसांनी बापू पारखे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे काही अंतरावर अपहरण झालेल्या साडेपाच वर्षाच्या वैभवचा संपूर्ण सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

मृतदेहाचे अवयव किड्यामुंग्यानी खाल्ले असल्याने या मुलाच्या मृतदेहाची फक्त डोक्याची कवटी व काही हाडे उरली आहेत. अंगावर केवळ पँट उरली आहे. वैभवच्या आईवडिलांनी मृतदेहाच्या अंगावरील कपड्यावरून मृतदेह वैभव ऊर्फ बालु याचा असल्याचे ओळखले. वैभवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला ससून रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान अपहरण झाल्यावर या मुलाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून मृतदेह्याची उत्तरीय तपासणी केल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

*