ABCD3 मध्ये जॅकलिन फर्नांडिस, सलमान खान?

0

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची जोडी लवकरच एका चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार आहे.

सन २०१४ मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटानंतर सलमान व जॅकलिन पुन्हा एकदा आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटात जॅक व सलमान असल्याचे कळतेय.

रेमो आपल्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा चित्रपट लवकरच घेऊन येतो आहे. या चित्रपटात सलमान व जॅक पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टायगर जिंदा है’नंतर सलमान या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे.

या चित्रपटाची हिरोईन फायनल झाली आहे. रेमोने यासाठी जॅकलिनला पसंती दिली आहे. रेमोने जॅकलिनला या चित्रपटाची आॅफर दिली आणि जॅकलिनला ती भावली.

सध्या ती भारताबाहेर आहे. तेथून परतल्यावर रेमो तिला संपूर्ण चित्रपटाचे नॅरेशन देणार आहे. यानंतर तिला या चित्रपटासाठी साईन केले जाणार आहे.

या चित्रपटात सलमान व जॅकलिन एका १३ वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

वडील आणि मुलीच्या नात्यावर विणलेली ही एक भावनिक कथा आहे. निश्चितपणे यात खूप सारा डान्सही आहे. डान्स म्हटल्यानंतर सलमानला यासाठी प्रचंड रिहर्सल्स करणेही आलेच.

 

LEAVE A REPLY

*