Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : कंबरदुखी ,सांधेदुखीसाठी पंचकर्म

आरोग्यदूत : कंबरदुखी ,सांधेदुखीसाठी पंचकर्म

हवेतील गारवा वाढलेला असताना होणार्‍या वेदना या बर्‍याच वेळेला सांध्यांशी तसेच मणक्यांशी संबंधित असतात. स्त्रियांना कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी तसेच पुरुषांमध्ये कंबरदुखी व गुडघेदुखी झालेली आढळते. स्त्रियांमध्ये ज्या वेळेस कंबरदुखीचा त्रास होतो त्या वेळेस गर्भाशयाशी संबंधितही ती असू शकते. त्याची शहानिशा तज्ज्ञ डॉक्टरकडून करून घ्यावी. थंडीमध्ये सांधा-मणक्यांचे विकार वाढलेले दिसतात. धावपळीचे जीवन, दुचाकी वाहनांवर फिरणे, रस्ते खराब असणे, बैठी कामे, मान खाली घालून काम करणे इत्यादी कारणांनी मणक्यांमध्ये वेदना होताना दिसतात. यालाच आधुनिक भाषेत ीिेपवूश्रूीळी म्हणतात. सध्या बँकेत काम करणार्‍या मंडळींमध्ये हे जास्त होताना दिसतात. याच्या लक्षणामध्ये हाताला किंवा पायाला मुंग्या येणे. या मुंग्या एखाद्या बोटाला किंवा बोटाच्या टोकालासुद्धा येऊ शकतात. हात-पाय जड पडणे, कंबरेच्या ठिकाणी किंवा मानेच्या ठिकाणी दाह होणे, मागच्या बाजूने डोके दुखणे इत्यादी लक्षणे आढळतात. स्त्रियांमध्ये जास्त पोळ्या लाटणे किंवा कपडे धुणे यामुळे हे विकार वाढताना दिसतात.

याची चिकित्सा करताना प्रथमत: डॉक्टरकडे जाऊन योग्य निदान होणे गरजेचे आहे. कारण जनमानसातील ज्ञान वाढले असल्याने तो वेगवेगळ्या प्रकारच्या ‘वेदनाहर’ गोळ्या खाऊन वेळ मारून नेतो. परंतु ‘वेदनाहर’ गोळ्या घेताना त्या वेगवेगळ्या प्रकारच्या योग्य स्थिती ओळखून घेतलेल्या केव्हाही उत्तम.

- Advertisement -

आयुर्वेद हे नैसर्गिकशास्त्र. त्रास होऊच नये म्हणून आपल्या प्राचीन शास्त्रात थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेलाचे मालिश करायला सांगितलेले आहे. यामध्ये औषधी  तेलाअगोदर तिळाचे तेल उत्तम. तिळाचे तेल गरम करून गुडघ्यांना, कंबरेला चोळले (रात्री झोपताना) तर थंडीची बाधा कमी होते. आयुर्वेदाने विशिष्ट आहार घेताना, रात्री झोपताना व जेवल्यानंतर गरम पाणी घेण्यास सांगितले आहे. कफप्रधान व्यक्तींनी जेवणाच्या शेवटी आले चावून खाल्ल्यास उत्तम फायदा होतो. त्याचबरोबर जेवणामध्ये तुपात/तेलात तळलेला लसूण खावा. वात वाढू नये, यासाठी जेवण भरपूर व गरमच करावे. जेवणानंतर लगेच झोपल्याने वात व कफ दोन्ही वाढतात. आज जेवण करून टी. व्ही. पाहता पाहता माणसे लगेच झोपताना दिसतात. हे हानीकारक आहे. शिळे अन्न खाल्ल्यानेसुद्धा वात वाढतो. उबदार कपडे घालून फिरणे व झोपणे हे महत्त्वाचे कारण. अवयवांमध्ये किंवा सांध्यामध्ये बदल असल्यास, गार हवा सरळ लागल्यास लगेच स्नायू आखडले जाऊ शकतात. अशा वेळेस तेल लावल्याने फायदा होतो. बसून काम करताना टेबलाची उंची व खुर्ची ही या पद्धतीने असावी की कंबरेवर व माकड हाडावर कोणत्याही प्रकारचा ताण पडू नये, तसेच मानसुद्धा जास्त खालच्या बाजूने होऊ नये, ही काळजी घेतल्यास बराच त्रास कमी होतो.

आयुर्वेदशास्त्राने या विकारांचा विचार करताना शारीरिक चिकित्सेचा विचार औषधरुपाने चिकित्सा, (म्हणजे गोळ्या वगैरे) तसेच पंचकर्म चिकित्सा असा दोन्ही प्रकारे केला आहे.

आयुर्वेद शास्त्राच्या गोळ्यांच्या चिकित्सेविषयी बर्‍याच गोळ्या शरीर प्रकृती अवस्था तसेच लक्षणांवरून बदलत असतात. सामान्यत: ‘गुग्गुळकल्प’ म्हणजे योगराज गुग्गुळ, महायोगराज गुग्गुळ, अमृता गुग्गुळ, महावात विध्वंस, सुवर्ण सूतकेशर, तिहनाद गुग्गुळ, वातनाशक इतर औषधे वापरली जातात. आयुर्वेदाने वाताचा प्रकोप हे मूळ मानले असल्या कारणाने मलावष्टंभ अर्थात संडासला साफ न होणे यावर मुख्य लक्षण दिले आहे. अशा लक्षणांच्या रुग्णाने संडासला साफ होण्यासाठी आहारातील बदल व औषधे घ्यावीत. रात्री झोपताना अर्धा कप गरम पाण्यात एक चमचा तूप टाकून घेतल्याने फायदा होतो. जेवणाअगोदर अर्धा चमचा तूप घेतल्याने भूक वाढते व वातसंचिती कमी होते. रात्री झोपताना गरम पाणी प्याल्याने फायदा होतो. अशा विविध प्रकारची औषधे निश्चितच दुखणे कमी करतात. अर्थात वैद्याच्या सल्ल्याने घेतल्यास उत्तम.

दुसरी आयुर्वेदाची चिकित्सा म्हणजे पंचकर्मातील स्नेह, स्वेदन, बस्ती, अभ्यंग व केखिम चिकित्सा म्हणजेच पिडीझिल, धारा इत्यादी फार उपयुक्त ठरतात. यामध्ये स्नेहन म्हणजे विविध औषधी तेले, बला तेल, अश्वगंधा तेल यामध्ये स्नेहन म्हणजे विविध औषधी तेले, सहचरादि तेल, प्रभंजन मर्दनम तेल इत्यादी. हे मणक्यांच्या ठिकाणी सांध्याच्या ठिकाणी चोळल्यास मूळ विकृती कमी होऊन व्याधी नाश होतो. स्वेदन या अंतर्गत विविध औषधी वनस्पतींच्या काढ्याची वाफ मानेला, कमरेला किंवा दुखर्‍या व विकृतीच्या भागाला देतात. या औषधांमध्ये वातनाशक गुण आतमध्ये जाऊन वेदना तत्काळ कमी होतात. या काढ्यामध्ये दशमूळ, बला, निर्गुडी, पुनर्नवा, देवदार, दारुहळद, टेंटू इत्यादी औषधी वनस्पतींचा उपयोग करतात. हे घरी कुकरमध्ये काढा करून शिट्टी काढून त्यावर गॅसची नळी लावून त्याद्वारे वाफ घेता येते. हा शेक शॉर्ट वेब थेरपी या आधुनिक चिकित्सा तंत्रासारखाच, परंतु तत्काळ आराम देणारा आहे. या शेकामध्ये सूज असल्यास तेल न लावता शेक घ्यावा. नंतर पंचकर्मातील बस्ती ही चिकित्सा शक्यतो वैद्यांकडून घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या