Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : औषधांचा बाजार

आरोग्यदूत : औषधांचा बाजार

बाजीराव सोनवणे (औषधनिर्माण अधिकारी )

आधी नमूद केल्याप्रमाणे आपल्याकडे जेनेरिक औषधे मूळ रासायनिक नावाने अगदीच नगण्य आहेत आणि सारे मार्केट गजबजले आहे. ते मुख्यत: विविध ब्रँड्सने. त्यामुळे स्पर्धा चढाओढ, मार्केटिंगचे बरे-वाईट तंत्र सारे आले.

- Advertisement -

यात काही ब्रँड स्वस्त, काही मध्यम, तर काही महाग, काही ब्रँडसचे (कंपनी ब्रँड्स) औषध उत्पादक कंपनीकडून डॉक्टरांकडे प्रमोशन केले जाते.

तर काही ब्रँड्सचे (यांना ब्रँडेड जेनेरिक असे म्हटले जाते) औषध विक्रेत्यांकडे म्हणजे अनुक्रमे ‘लिहा’ व ‘खपवा’ अशी तंत्रे वापरली जातात. परिणामी औषध उत्पादक कंपनीच्या या चढाओढीत जेनेरिकची मूळ संकल्पना पार धुळीस मिळते व औषधे ‘ऑफ पेटंट’ असूनही रुग्णांसाठी ती काही स्वस्त होत नाहीत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग अ‍ॅथॉरिटी औषधांच्या किमती नियंत्रित करते; पण तरीही एकाच औषधाच्या विविध ब्रँडस्च्या किमतीची रेंज मोठी. किमतीमध्ये पाच ते दहापट किंवा अधिकही फरक दिसतो. उदा. कोलेस्टेरॉलसाठीच्या अटोरव्हास्टाटीनच्या 10 मि. ग्रॅ. च्या 10 गोळ्यांचे पाकीट 93 रुपयांनाही आहे, तर दुसरे 12 रुपयांनाही.

ब्रँड सबस्टिट्यूशन

परदेशात फार्मसिस्टला (त्या औषधाचे एकाऐवजी दुसरे उत्पादन) करण्याची मुभा असते. डॉक्टरही प्रिस्क्रिप्शनमध्ये औषध मूळ रासायनिक नावाने लिहितात किंवा ब्रँड सबस्टिट्यूशन चालेल वा नाही, हे लिहितात. त्यामुळे महागड्या पेटंट ब्रँडऐवजी स्वस्तातील जेनेरिकचा पर्याय रुग्णास सहज उपलब्ध होतो.

आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन गटातील औषधांसाठी फार्मसिस्टने किंवा रुग्णाने आपणहून ब्रँड बदलणे अपेक्षित नाही. प्रिस्किप्शन गटात (डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच घेण्याची औषधे, लेबलवर झु ही खूण, लाल रंगाची रेघ (डलहशर्वीश्रश क थरीपळपस)  सर्वच महत्त्वाची औषधे म्हणजे अँटिबायोटिक, मधुमेह, हृदयरोग, मानसिक आजार वगैरे येतात. डॉक्टरांनी लिहिलेला ब्रँड केमिस्टने देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे जरी केमिस्टच्या दुकानात स्वस्त पर्याय उपलब्ध असला तरी डॉक्टरांनी संमती दिली तरच देणे अपेक्षित आहे. ‘सत्यमेव जयते’मध्ये केमिस्टच्या दुकानातून डॉक्टरांनी लिहिलेले ब्रँडच दिले गेले का, बदली दुसरे ब्रँड किंवा मूळ नावाने औषधे दिली गेली, याचा उलगडा होत नाही. केमिस्टच्या दुकानातही एकाच औषधाचे महाग/स्वस्त ब्रँड उपलब्ध असतातच; पण सुशिक्षित रुग्ण डॉक्टरांनी दिलेल्या ब्रँडचाच आग्रह धरतात, असे फार्मसिस्ट आवर्जून सांगतात.

बायो -इक्विव्हॅलन्स (समतुल्यता) :

औषध प्रत्यक्षात रक्तात किती पोहोचते, यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. बायो-इक्विव्हॅलन्स ही चाचणी रक्तातील औषधाची नेमकी पातळी बघण्यासाठी करतात. पेटंट संपल्यानंतर पहिल्या चार वर्षांत येणार्‍या जेनेरिकसाठी हे सक्तीचे आहे; पण त्यानंतर नाही. समजा एका औषधाचे शंभर जेनेरिक ब्रँड आहेत, तर या सार्‍यांची गुणवत्ता, त्यांचे रक्तात पोहोचण्याचे प्रमाण इनोव्हेटर औषधांच्या समतुल्य आहे. याची खात्री कोणी देऊ शकेल का? कदाचित सर्वच शंभर बँ्रड असतीलही किंवा काही नसतीलही. ज्या औषधांचा सुरक्षितता निर्देशांक कमी आहे. त्यांच्यासाठी ही चाचणी करणे तर विशेष आवश्यक असते. उदा. रक्त गोठू नये म्हणून वापरता येणारे ‘वारफारीन’सारखे औषध, फिट्सवरील औषधे, हृदयरोगाची औषधे.

परदेशात डोकावून पाहिले तर दिसते की, तेथे एकेका इनोव्हेटर औषधाची मोजकीच जेनेरिक उत्पादने आहेत. जेनेरिकच्या किमती इनोव्हेटरपेक्षा खूप जास्त आहेत. (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस), क्वॉलिटी कंट्रोलचे निकष अत्यंत कडक असल्याने जेनेरिकची गुणवत्ता, दर्जा याबद्दलची निश्चिती असते. जेनेरिक औषधांवरही बायो-इक्विव्हॅलन्स चाचणी करावीच लागते.

- Advertisment -

ताज्या बातम्या