Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : कॅन्सर रुग्णांना उपयुक्त स्वेदन

आरोग्यदूत : कॅन्सर रुग्णांना उपयुक्त स्वेदन

कॅन्सरसारखी व्याधी झाल्यावर, मग तो शरीरातील कोणत्याही अवयवाचा असो, रुग्ण तसेच रुग्णाचे नातेवाईक कॅन्सरवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने, सल्ल्याने करत असतात. हे प्रयोग शास्त्रोक्त पद्धतीने न केल्यामुळे त्यांचा रुग्णावरील परिणाम स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच अनेक वेळा त्याने रुग्णाची लक्षणे वाढण्यासाठी कारणीभूत झालेली असतात. युरोपीय देशातील शास्त्रज्ञांनी अशा इतर शास्त्रीय पद्धतींचा कॅन्सरचा रुग्णावरील परिणाम संशोधनासाठी वेगळा विभाग स्थापन केला असून, त्या विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर शास्त्रज्ञ प्रयोग करून त्याचे निश्चित असे निष्कर्ष काढत आहेत.

शरीराची उष्णता, मूळ उष्णतेपेक्षा वाढवल्यास कॅन्सरच्या पेशी मरण पावतात, असे प्रयोगात आढळून आले आहे. 42.6 डिग्री सेंटीग्रेड या तापमानात कॅन्सरपेशी मरण पावण्यास सुरुवात होते तर इतर प्राकृत पेशींवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. सायबेरियन शहरातील कोट्टोब्रिस्क आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य केंद्रातील निष्कर्षानुसार या पद्धतीचा उपयोग केल्यास कॅन्सरवर वापरल्या जाणार्‍या औषधांची कार्यशक्तीही वाढते. तसेच औषध इतर पेशींची प्रतिकारक्षमता वाढवते. या चिकित्सा जनरल मॅनेज हायपरथेरमी असे म्हणतात. या चिकित्सेसाठी पाण्याच्या टबमध्ये रुग्णास बसवले जाते व ते पाणी 46 डिग्री तापमानापर्यंत तापवले जाते. या पाण्यात 40 मिनिटे बसवून सातत्याने डॉक्टरांकडून निरीक्षण केले जाते. ही क्रिया शरीरातील अवयवाची उष्णता वाढवून, हृदयाच्या कार्याससुद्धा मदत करते असे आढळून आले आहे. या वेळेस फुफ्फुसाची उपकरणे तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जाते. शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानाइतके तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणले जाते. डॉ. ओलेग सॅबाटीन यांनी ही चिकित्सा पद्धती 1800 कॅन्सर रुग्णांवर वापरली असून त्यातील 938 मोठ्या प्रकारच्या कॅन्सर रुग्णांवर वापरून अतिशय उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

हायपरथेरमी ही कॅन्सर रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे. कारण बर्‍याच  वेळा आवश्यक ठरणार्‍या कॅमोथेरपीचे दुष्परिणाम याने कमी होतात. असे दिसून येत आहे. डॉ. पीटर तुलेनेव या शास्त्रज्ञांच्या मते केस गळणे, स्थौल्य यासारखे दुष्परिणाम कमी झालेले आढळते. तसेच कॅन्सरच्या  पेशींवर कॅमोथेरपीच्या औषधांचा परिणाम लवकर झालेला दिसून आला व बर्‍याच वेळा कॅमोथेरपीच्या औषधांची शरीराला सवय होते व त्यामुळे पुढे त्या औषधांचा त्या प्रमाणात उपयोग होत नाही. हे दुष्परिणाम यामुळे टळतांना दिसले.

हायपरथेरमीच्या पाण्यात काही वनस्पती तसेच ऐषधी तेले टाकून त्याचा आणखी परिणाम काय होतो. हे पाहण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत. वरील पद्धती आयुर्वेदशास्त्रातील पंचकर्मातील स्वेदन या प्रकाराशी मिळती जुळती दिसते. आयुर्वेदात वर्णन केलेल्या स्वेदनामध्ये प्रकृती, व्याधी, अवस्था यांचा नीट अभ्यास करून रुग्णाला दिलेली औषधी काढ्याची वाफ निश्चितच उपयुक्त ठरू शकते. या स्वेदन प्रकारात मानेच्या खालच्या भागाला वाफ देण्यासाठी खास ‘स्वेदन पेटी’चे वर्णन शास्त्रात आढळते व त्याचा वापर अनेक आयुर्वेदातील पंचकर्म करणारे वैद्य करताना दिसतात. कॅन्सरच्या अवस्थेमध्ये आयुर्वेद तज्ज्ञांकडून रुग्णाच्या शक्तीचा विचार करून वाफेसाठी औषधे, शरीरोपयोगी तसेच व्याधीनाशक अशी ठरवून उपयोग केल्यास, यापुढील या विषयावरील संशोधने आपल्याकडून युरोपीय देशात निर्यात होतील, यात शंकाच नाही. कारण शास्त्राने पाच हजार वर्षांपूर्वी यावर विवेचन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केले आहे व आज तेच प्रत्यक्ष प्रयोगाने युरोपीय देशांनी सिद्ध केले आहे.!

- Advertisment -

ताज्या बातम्या