आरोग्यदूत : मेंदूज्वर आणि मेंदूचा दाह

आरोग्यदूत : मेंदूज्वर आणि मेंदूचा दाह

डॉ योगिता पाटील 

या भयावह आजाराची पालकांना कल्पना देणे हाच या थोडक्यात लिहिलेल्या लेखाचा हेतू आहे. मेंदूचा दाह किंवा एनसिफॅलायटिसचे निदान करणे, तसेच मेंदूज्वर आणि मेंदूचा दाह या दोहोंतील फरक ओळखणे डॉक्टरांनाही कठीण वाटते.

एनसिफॅलायटिस हा विषाणूजन्य आजार आहे आणि अद्यापही काही विशिष्ट परिस्थिती वगळता त्यावरची विशिष्ट उपचारपद्धती उपलब्ध नाही. मेंदूज्वर या बॅक्टेरियाजन्य आजार आहे आणि तो दूर करण्यासाठी आपल्याकडे ढीगभर जैवप्रतिरोधक औषधे उपलब्ध आहेत.

एनसिफॅलायटिस म्हणजे मेंदूचा दाह (मेंदूज्वर म्हणजे मेंदूच्या आवरणांचा दाह) हा दाह सौम्य. स्वयंमर्यादित आजार असू शकतो आणि त्याच्यामुळे मेंदूच्या कार्यात गंंभीर अडथळा येऊ शकते. यातून मृत्यू किंवा कायमस्वरुपी अपंगत्व उद्भवू शकते.

हा आजार सहसा अचानक होतो. परंतु काही वेळा तो हळूहळू होतो. सहसा खालील लक्षणे दिसतात.

* भरपूर ताप, सातत्याची डोकेदुखी, उलट्या, झटके येणे, मानसिक गोंधळ, त्रासिकपणा किंवा औदासिन्य, भान हरपणे, बोलण्यात अडथळे, डोळ्यांच्या स्नायूचा पक्षाघात, अर्ध्या शरीराचा पक्षाघात, अंधत्व.

गोवर, जर्मन गोवर, नागीण, जापनीज एनसिफॅलायटिस, रेबीज इ. सायटोमेगॅलोव्हारस इ. सर्वसाधारण विषाणूजन्य आजारांमुळे मेंदूचा दाह उद्भवू शकतो.

उपचार 

आयुष्य वाचवणे आणि अपंगत्व रोखणे हाच उपचाराचा हेतू असतो. यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. रुग्णालयात भरती केलेल्या मुलावर आजाराच्या गुंतागुंतीचा विचार करून योग्य ते उपचार केले जातात. श्वसनविषयक, हृदयविषयक आणि मेंदूविषयक गुंतागुंती या विकारात निर्माण होऊ शकतात.

विषाणू प्रतिरोधक औषध, अ‍ॅसिक्लोविहर हे नागिणीच्या विषाणूमुळे होणार्‍या मेंदूच्या दाहावर प्रभावी ठरते. जापनीज एनसिफॅलायटिसचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे ‘जेई’ नावाची लसही उपलब्ध आहे. या आजाराच्या विषाणूंचा प्रसार डासांकडून होत असल्यामुळे मुलाचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. मात्र इतर कोणत्याही प्रकारचा मेंदू दाहामध्ये आपण संपूर्ण वैद्यकीय आधार देण्याखेरीज अन्य कोणतीही विशिष्ट उपाययोजना करू शकत नाही.

आजाराचा प्रसार हा विधि प्रकारचा असू शकतो. सहसा तो स्वयंमर्यादित असतो आणि कोणतेही अपंगत्व न येता मूल बरे होते. परतु गंभीर स्वरुपाच्या आजारात कायमस्वरुपी अपंगत्व किंवा मृत्यू असे दुर्दैवी प्रकार घडतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com