Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

नवी दिल्ली : ‘आरे’तील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. पर्यावरणप्रेमींना यामुळे दिलासा मिळाला असला तरी अनेक अनेक झाडांची कत्तल झाली तसेच अनेक पक्ष्यांचा अधिवास यानिमित्ताने नष्ट झाल्याने पर्यावरण प्रेमी नाराज झाले आहेत.

आंदोलन करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यांची सुटकाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी येत २१ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच आतापर्यंत किती झाडे तोडली त्याचा तपशीलही देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. झाडे तोडण्याची कार्यवाही थांबवून आहेत त्याच स्थितीत ठेवण्यात यावीत.

जी पर्यायी झाडे लावली आहेत त्यांचीही देखभाल करावी असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत. दिल्ली, ग्रेटर नॉएडा येथील लॉ कॉलेजचा विद्यार्थी रिषभ रंजन याने काल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून मुंबई आरे कॉलनीमधील विदारक परिस्थिती निदर्शनास आणली आणि तातडीने सुनावणी घेऊन झाडे तोडण्यावर स्थगिती आणण्याची विनंती केली.

त्याचबरोबर युवा आरे आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या वर्तणुकीकडेही लक्ष वेधले. त्याची दखल सरन्यायाधीशांनी घेतली आणि या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. तसेच सध्या सुप्रीम कोर्टाला दसरा सणानिमित्त आठवड्याभराची सुटी असल्याने सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती अशोक भूषण यांचे विशेष खंडपीठ स्थापन केले.

त्यांनतर आज सकाळी या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. कोणीही आंदोलक अद्याप अटकेत असतील तर त्यांना तात्काळ सोडण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. खंडपीठाने प्रशासनाला वरीलप्रमाणे आदेश दिल्यानंतर या विषयावरील पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात पर्यावरणविषयक विषयांवर असलेल्या ‘वन खंडपीठ’समोर २१ ऑक्टोबरला होईल, असे स्पष्ट केले.

मेट्रो कार शेडचा मार्ग मोकळा 

मेट्रो कार शेडसाठी जितकी झाडं तोडणे आवश्यक होते, तितकी तोडून झाली आहेत. आता आणखी कोणतीही झाडं कापायची नाहीत, अशी माहिती सॉलिसिटर जनरल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे‘ चा आदेश दिला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक कारवाई झालेली असल्याने आता आणखी झाडे तोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ‘जैसे थे‘ था आदेश हा वृक्षतोडीला आहे. प्रकल्पाला स्थगिती नाही. त्यामुळे मेट्रो कार शेडचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे बोलले जात असल्याने आरेचे वादळ शमण्याची शक्यता कमीत दिसते आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!