स्केटिंग खेळातील उदयन्मुख तारा

0

नाशिक । नाशिकच्या क्रीडा संस्कृतीत उदयोन्मुख खेळांडूच्या यशामुळे नित्याने भर पडत आहे. खेळाडूंना घडवणारी नगरी म्हणून नाशिकची ओळख होऊ पहात आहे. कविता राऊत, दत्त भोकनळ, डॉ. महाजन बंधू अशा अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंची जडणघडण याच नगरीत झाली, त्यामध्ये एक नाव नव्याने दाखल होऊ पाहत आहे. ते म्हणजे स्केटींगच्या क्षितीजीवरील उदयन्मुख तारा आरव मंत्री. स्केटिंगमध्ये अरवने केलेल्या कामगीरीचा हा लेखाजोखा…

आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात नाशिकच्या अरव शिवलाल मंत्री याची निवड झाली आहे. 11 ते 13 ऑगस्टदरम्यान बेल्जियम येथे खेळवल्या जाणार्‍या स्पर्धेसाठी अरव उद्या (दि. 8) रोजी सकाळी रवाना होणार आहे. देशभरातून स्पर्धेसाठी 35 खेळाडूंचा निवड झाली असून 12 वर्ष वयोगटातील तो नाशिकमधील एकमेव खेळाडू आहे. आरव प्युपिलेन प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेसाठी अरवची निवड झाल्याने नाशिकचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून नाशिककरांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

शाळेत प्रवेश घेण्याअगोदर फक्त अडीच वर्षाचा असतानाच अरवने स्केटिंगची सुरुवात केली. वय कमी असले तरी त्यांच्या मेहतीमुळे वयाच्या नवव्या वर्षीची त्याची आंतराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली. पहिल्यापासून गतीची आवड असल्याने इतर खेळ निवडण्याऐवजी स्केटिंगची निवड केल्याचे अरव सांगतो. इतर खेळाच्या तुलनेत हा खेळ गतीमान असल्याने सुरुवातील भीती वाटत होती, मात्र हळुहळू सरावानंतर त्याचा मनातील भीती दूर झाली. स्केटिंग प्रशिक्षक सविता बुलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्केटिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्यात प्रशिक्षकांबरोबरच आई-बाबा मोलाचा वाटा असल्याचे तो सांगतो.

2014 मध्ये राज्यस्तरावर खेळवल्या गेलेल्या ओपन रोलर स्केटिंग स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये पार पडलेल्या 25 व्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने यशस्वी सहभाग नोंदवला. 2015 साली झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत त्याने प्रथम क्रमाक पटकवला. याशिवाय 2016 या वर्षात विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धामध्येही त्याने यशस्वी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. या वर्षी जानेवरी महिन्यात नागपूर, कर्नाटक, पुणे, नंदुरबार आदी ठिकाणी खेळवल्या गेलेल्या स्पर्धेतही त्याने यशस्वी कामगिरी केली. दि. 4 ते 14 जुलै दरम्यान पुणे येथे झालेल्या टेनिंग कॅम्पमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर त्याची आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली आहे.

आता 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम येथे खेळवल्या जाणार्‍या या स्पर्धेत अरव कशा प्रकारे कामगीरी करतो याकडे नाशिक क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*