Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

वाढत्या बेरोजगारीविरोधात ‘आआपा’चे चहा-पकोडे आंदोलन

Share

नाशिक | प्रतिनिधी

‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवत. यामुळे निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी (आआपा) युवा आघाडीने शालिमार परिसरात ‘चहा-पकोडे’ मोफत वाटत आंदोलन केले.

2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी युवकांना 2 कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. परंतु नवीन रोजगार निर्माण झालेच नाही शिवाय नोटबंदी, GST च्या निर्णयाने अनेक रोजगार बुडाले. आणि आता प्रधानमंत्री युवकांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचे सल्ले देत आहेत.

याचा निषेध करण्यासाठी याप्रसंगी डाॅक्टर, वकिल, इंजिनियर यांची वेशभुषा करून कार्यकर्त्यांनी नागरीकांना मोफत चहा पाजला आणि मोदी-फडणवीस हाय हाय, नोकरी नाही-बेरोजगार नाही या सरकारला लाज नाही.

रोजगार न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, भाई मांगे-नोकरी; बहन मांगे नोकरी, मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे यासारख्या घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.

आगामी काळात खोटारड्या मोदी-फडणवीस सरकारला मत न देण्याचेदेखील नागरीकांनी बोलून दाखविले. राजकारणाऐवजी शाळा, रोजगार, आरोग्य याचे राजकारण करेल अश्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.

शालिमार परीसरात याप्रसंगी मोठी झुंबड उडाली होती. यावेळी ऍड.प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, महेंद्र मगर, सुमित शर्मा, अल्बाशी शेख, साहिल सिंग, शुभम पडवळ,रमेश मराठे काका, विनायक येवले, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!