Type to search

हिट-चाट

तांत्रिक आणि अनेक कलाकारीने परीपूर्ण ‘आणि काय हवं?’ सिझन २

Share

खऱ्या आयुष्यातील साथीदार असलेले प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा आपल्याला आणि काय हवं? सिझन २ च्या निमित्ताने जुई आणि साकेतच्या वैवाहिक आयुष्याची गमतीदार कहाणी सांगायला आले आहेत.

‘आणि काय हवं?’च्या दुसऱ्या पर्वाची चर्चा मनोरंजन सृष्टीत चांगलीच गाजत असून प्रेक्षकांच्या मनात हळुवार उतरणारी ही कथा दिग्दर्शक वरून नार्वेकर यांने उलगडली आहे.

“आणि काय हवं? सिझन २” ही भावनिक आणि कथेच्या दृष्टीने एक सुंदर उदाहरण ठरत असताना ही वेबसिरिज तांत्रिक दृष्टीने सुद्धा सबळ दिसते आहे. जुई आणि साकेतच्या सुंदर घरापासून ते चित्रीकरणाच्या प्रत्येक स्थळाच सौंदर्य सादरीकरणात प्रेक्षकांपर्यंत उत्तम पोहोचावे, व्हिज्युअली कथा सुशोभित दिसावी यासाठी उत्कृष्ट कॅमेरा तंत्रांचा उत्तम वापर केला आहे.

पहिल्या सिझन पेक्षा या सिझन मधून प्रेक्षकांपर्यंत जुई आणि साकेतच्या या कथेला क्रिएटिव्ह रित्या पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक वरुण नार्वेकर याने केला आहे. तांत्रिकरित्या सक्षम असलेल्या ‘आणि काय हवं? सिझन २’चे अनेक जणांनी सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे.

या वेबसिरिजच्या पहिल्या भागात एकमेकांसाठी पूर्ण पणे नवे असलेले जुई आणि साकेत यांच्या नव्या प्रेमाची गोष्ट उलघडली होती. आता दुसऱ्या भागात मात्र नव्या गोष्टींसोबत आता लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या नात्यातील नोकजोक त्याच्या संसार आणि त्याच नात अलगद उलगडणार हे पर्व आहे. ‌’आणि काय हवं?’ च्या दुसऱ्या सिझनच वेगळेपण म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत याची वेबसिरिज मध्ये मुख्य भूमिका असली तरी आपले आवडते असे अनेक चेहरे दुसऱ्या पर्वात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतात.

क्षिती जोग, उदय नेने, विक्रम पटवर्धन, प्रियदर्शन जाधव, धीरेश जोशी, उदय सबनीस, विना फडके,ऐश्वर्या अहेर, दीप्ती महादेव, अरुण पटवर्धन, चैताली माझगावकर पर्यंत सगळ्या कलाकारांनी जुई साकेतच्या प्रवासात साथ दिली आहे. जुई आणि साकेत यांचा हसत खेळत सुखी जीवन जगणारा संसार आहे.

यात छोट्या छोट्या गोष्टींमधूनही दोघांना मिळणारा आनंद, प्रत्येक गोष्ट हटके पद्धतिने सेलिब्रेट करणाऱ्या दोघांच्या आयुष्यात ही पात्र अजून आनंद आणि रंग भरतात. या संदर्भात उमेश सांगतो “जुई आणि साकेतची जरी ही गोष्ट असली तरी तिला पुढे जाऊन अजून पात्रांची जोड हवी होती तेव्हा ती अजून खुलेलं म्हणून या पात्रांची निर्मिती करण्यात आली.

जुई आणि साकेतच्या जगात ही पात्र एकदम घट्ट बसतात. लग्न झालेल्या जोडप्याच्या मध्ये अनेक जणांची अस असताना त्यांनी जी पात्र साकारली ती एकप्रकारे गोडवा देणारी पात्र आहेत. वेबसिरिजच्या दुसऱ्या पर्वात ही एक वेगळी कथा आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे.” यालाच जोडून प्रिया सांगते “वेबसिरीजला पहिल्या पर्वात आम्हीच दिसलो असलो तरी दुसऱ्या पर्वात या पात्रांची गरज होती, ही पात्र नेहमीच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पैकीच आहेत.

त्याच्यातला प्रत्येक जण हा जुई आणि साकेतच्या आयुष्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडत असतो.” भांडणातही गोडवा असणाऱ्या हे नातं उलगडणारी ही कथा सहा भागात उलघडली असून ती एम एक्स प्लेयरवर विनामूल्य पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!